साफ सफाई कामगार महिला विविध मागण्यासाठी करणार आंदोलन

0
706

पिंपरी,दि.२४(पीसीबी) – कोरोना काळात सर्वजण घरात बंद असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत असणाऱ्या सोळाशे साफ सफाई कामगार महिलांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता, शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले आहे, कोरोना आपत्ती काळात सेवा दिल्या बद्दल कायम कामगारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकावतीने भरघोष आर्थिक मदत दिली परंतु, कंत्राटी पद्धतीने कामे करणाऱ्या साफसफाई कामगार महिलांना मात्र दीड हजार रुपये मदत करण्याचे जाहीर केले आहे. हि मदत अत्यंत तुटपुंजी आहे. किमान पाच हजार रुपये आर्थिक मदत करावी,दिवाळीनिमित्त पगार एवढा बोनस देण्यात यावा, साफसफाई कामगार महिलांचा थकीत प्रा.फंड तातडीने देण्यात यावा,समान काम समान दाम या पद्धतीने ,आणि सरकारने ठरवून दिले प्रमाणे किमान वेतनाचा फरक मिळवून द्यावा,गेली अनेक वर्षांपासून साफसफाई कामगार महिला महानगरपालिकेतकामे करत आहेत, त्यांचे सेवेतील योगदान लक्षात घेता त्यांना कायमस्वरूपी महानगरपालिका सेवेत सामावून घ्यावे, घरकुल योजनेत साफसफाई कामगार महिलांना प्रधाने देण्यात यावे , आदी विविध मागण्यांसाठी कष्टकरी कामगार पंचायवतीने सोमवार दिनांक २६-१०-२०२० रोजी सायंकाळी ४ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे यात साफ सफाई कामगार महिला सहभागी होणार आहेत.

कष्टकरी कामगार पंचायत वतीने पिंपरी येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शन केंद्रात साफसफाई कामगार महिलांच्या प्रश्नावर बैठक घेण्यात आली , या वेळी हा निर्णय घेण्यात आला आहे,कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक घेण्यात आली,या वेळी बळीराम काकडे, आशा कांबळे अनिता साळवे , सविता लोंढे, मंगल तायडे,मथुरा डांगे,कांता कांबळे आदी उपस्थित होत्या.