साने चौकीत तक्रार करायला आलेल्या महिलेचा पोलिसाने केला विनयभंग

0
1147

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – साने चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या ३६ वर्षीय विवाहित महिलेचा पोलिसानेच विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे कृत्य करणारा पोलिस हा सहायक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे.

राजेंद्र पालवे असे या पोलिसाचे नावे असून तो साने चौकीत कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत महिला १० ऑक्टोंबरला तिच्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी साने चौकीत आली होती. त्यावेळी राजेंद्र पालवे या पोलिसाने, मी आहे, तुम्ही घाबरू नका असा आधार देत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता या पोलिसाने पीडीत महिलेच्या मुलाच्या फोनवर फोन केला. आणि आईकडे फोन दे असे त्याला सांगितले. मुलाने पीडीत महिलेकडे फोन दिल्यावर पोलिसाने त्यांची विचारपूस करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि थेट आय लव्ह यू म्हणाला.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी पीडीत महिलेने चिखली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.