Desh

साध्वी प्रज्ञा भाजपमध्ये; भोपाळमधून दिग्विजय सिंहांविरोधात लोकसभा लढवणार

By PCB Author

April 17, 2019

भोपाळ, दि. १७ (पीसीबी) – मध्य प्रदेशात भाजपने लोकसभा उमेदवारांची  यादी जाहीर केली आहे. या  यादीत भाजपमध्ये आज (बुधवारी) प्रवेश केलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळमधून  उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भोपाळमध्ये आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा अशी चुरशीची लढत होणार आहे.  

साध्वी प्रज्ञा यांच्याकडे कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा  यांच्या आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात राष्ट्रीय तपास न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून निर्दोष  मुक्तता केली आहे.

पत्रकारांशी बोलताना साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, मी भाजपमध्ये औपचारीक प्रवेश केला  आहे. मला भोपाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार,  असे विश्वास त्यांनी यावेळी व्यकत् केला. निवडणुकीबाबत  भोपाळमधील भाजपा कार्यालयात  त्यांनी भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान, राम लाल आणि प्रभात झा यांच्याशी चर्चा केली.