साध्वी प्रज्ञांच्या लोकसभा उमेदवारीविरोधात याचिका

0
755

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. याविरोधात एनआयए  न्यायालयात मालेगाव बॉम्बस्फोटात मुलगा गमावलेल्या नासिर बिलाल यांनी याचिका दाखल  केली आहे. साध्वी प्रज्ञासिंहला निवडणूक लढण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.   

तर दुसरीकडे  काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला यांनीही साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारी विरोधात निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. भोपाळच्या भाजप उमेदवार२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. खटला अजून प्रलंबित आहेत. भाजप धर्माच्या आधारावर मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी तहसीन पूनावाला यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपने  लोकसभेसाठी  २२ उमेदवारांच्या यादी जाहीर केली आहे. त्यात  साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर  यांना  मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून  उमेदवारी दिली आहे. त्यामुळे  येथे काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर अशी लढत रंगणार आहे.