साध्वीच्या भावना, व्यथा समजून घेतल्या पाहिजेत – संजय राऊत  

0
646

मुंबई , दि. २० (पीसीबी) –  ज्याप्रकारे एका महिलेला यातना देण्यात आल्या, तिची प्रतारणा करण्यात आली.  ते कोणत्याही कायद्यात बसत नाही. साध्वीची भावना-पीडा तुम्ही समजून घ्यायला हवी,  तसेच त्यांची व्यथा समजून घेतली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांची पाठराखण केली आहे.

राऊत पुढे म्हणाले की, मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी  हल्ल्यात  हेमंत करकरे शहीद झाले, पण त्यांचे नाव नेहमीच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चौकशीत चर्चेत राहिले. परंतु, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहीत यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्याची किंमत चुकवावी लागली,  असे राऊत म्हणाले.

दरम्यान, हेमंत करकरेंना आपल्या कर्माची फळे मिळाली.  दहशतवाद्यांनी जेव्हा करकरेला ठार केले. तेव्हा माझे सुतक संपले, अशा शब्दांत साध्वीने आपल्या  मनातील द्वेष  व्यक्त केला होता. यावर साध्वी यांच्यावर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अखेर साध्वी यांनी आपल्या विधानावर माफी मागून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.