Desh

साध्या ड्रेसिंगबद्दल मनोहर पर्रीकरांनी काय म्हटले होते?

By PCB Author

March 18, 2019

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) –  एका कार्यक्रमात संरक्षणमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर सहभागी झाले होते. यावेळी त्यांची मुलाखत  घेताना पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी पर्रिकर यांना त्यांच्या साध्या ड्रेसिंगबद्दल प्रश्न केला होता. यावर त्यांनी  मला सूट वगैरेसारख्या पाश्चिमात्य कपड्यांमध्ये अस्वस्थ व्हायला होते,  असे उत्तर दिले होते.

देशातील सर्वात महत्वाच्या खात्यांपैकी एका खात्याचे मंत्री असणाऱ्या तुमचा ड्रेसिंग सेन्स अगदीच साधा वाटत नाही का?  असा प्रश्न त्यांना केला होता.  या प्रश्नाला उत्तर देताना पर्रिकर  म्हणाले की, आधीच्या संरक्षणमंत्र्यांपेक्षा माझा कपडे चांगलेच असल्याचा टोलाही त्यांनी काँग्रेसच्या काळात संरक्षणमंत्री असणाऱ्या ए. के. अॅण्टनी यांचे नाव न घेता लगावला होता.

पुढे बोलताना त्यांनी कोल्हापूरी चप्पलचाही एक किस्सा सांगितला होता. ‘संरक्षणमंत्री म्हणून देशातील सर्वात महत्वाच्या पदांपैकी एक असणाऱ्या पदावर असताना मला माझ्या आवडत्या कोल्हापूरी चप्पल घालण्याबद्दल थोडी चिंता वाटायची,’ असंही पर्रिकर यांनी हसत सांगितले होते.