Maharashtra

सात दिवस मुंबईची लोकल सेवा बंद केल्यास लाखो लोकांना करोनाच्या संसर्गापासून रोखता येईल – पंकजा मुंडे

By PCB Author

March 17, 2020

महाराष्ट्र,दि.१७(पीसीबी) – सात दिवस मुंबईची लोकल सेवा बंद केल्यास लाखो लोकांना करोनाच्या संसर्गापासून रोखता येईल, असं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

“मुंबई बंदची मदत होऊ शकते का? जर नियोजनबद्ध पद्धतीनं मुंबई बंद केली तर लोकं जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील. जर सात दिवसांसाठी लोकल सेवा बंद ठेवल्यास लाखो लोकांना करोनाच्या संसर्गापासून रोखण्यास मदत होईल. फक्त लोकांना आवश्यक असेल त्या वस्तूंच्या विक्रीची दुकांनं उघडी ठेवण्यात यावी,” अशा आशयाचं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, सरकारकडून करोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यावर पंकजा मुंडे यांनी सात दिवस मुंबईची लोकल सेवा बंद केल्यास लाखो लोकांना करोनाच्या संसर्गापासून रोखता येईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. जर नियोजनबद्ध पद्धतीनं मुंबई बंद ठेवली तर त्याचा लाखो लोकांना फायदा होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.