साताऱ्यात नवविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
606

सातारा, दि. १९ (पीसीबी) – नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी नऊच्या सुमारास साताऱ्यातील निरसाळे गावात घडली.

आकाश मांढरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आकाश मांढरे या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.आत्महत्या केलेल्या आकाशचा आठ दिवसांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. गेल्या चार दिवसांपासून तो पोलिस स्थानकाच्या चकरा मारत होता.   मात्र त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेली नाही.