साताऱ्यात एकच पैलवान दिसत आहे- शरद पवार  

0
917

सातारा, दि. ५ (पीसीबी) –  सातारा तालिम संघातील पैलवानांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार शासकिय विश्रामगृहात उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती  पैलवानांकडून करण्यात आली. यावेळी फोटोसाठी उभ्या असलेल्या पैलवानांकडे बघत पवार म्हणाले की, पैलवानांसोबत फोटो काढायला सांगतायं  पण, यापैकी एकही पैलवान दिसून येत नाही. मात्र, खासदार उदयनराजे यांच्याकडे बघत हा एकच पैलवान दिसत आहे, असा चिमटा पवारांनी काढताच हस्यकल्लोळ उडाला.  

शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या  कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांची साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह कुस्तीगिर परिषदेच्या कामानिमित्त्त  सुधीर पवार तसेच सातारा तालिम संघातील काही पैलवानांनी  भेट घेतली.

यावेळी पैलवानांनी पवार यांच्यासोबत फोटो काढण्याची  इच्छा  व्यक्त केली. पवारांनी ती मान्य करत त्यांच्यासोबत  फोटोसाठी ते उभे राहिले. त्यावेळी   काही पैलवानांनी उदयनराजेंनाही फोटोसाठी उभे राहण्याची विनंती केली. यावेळी पवार म्हणाले की, पैलवानांसोबत फोटो काढायला सांगताय पण, यापैकी एकही पैलवान दिसत नाही.  तसेच उदयनराजेंकडे बघत  पवारांनी मात्र, हा एकच पैलवान दिसत आहे, असा चिमटा काढला. यावर उपस्थितांमध्ये एकच हस्या  पिकला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य विश्‍वजित कदम उपस्थित होते.