साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजेंचे भाषण आंदोलकांनी रोखले

0
1348

सातारा, दि. २५ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साताऱ्यात विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजेंनी भाषण सुरु केल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत  त्यांचे भाषण बंद पाडले. त्यानंतर सुरू झालेल्या गोंधळामुळे आमदार शिवेंद्रराजे, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना माघारी फिरावे लागले.  

राजवाडा परिसरातून सुरू करण्यात आलेल्या या मोर्चात आमदार सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी केवळ  सहभाग घ्यावा, भाषण करु देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.  मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले हे भाषणासाठी उभे राहिले. मात्र, मोर्चेकऱ्यांनी त्यांना बोलू दिले नाही.

या गोंधळानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी त्यांनाही रोखले. दरम्यान,शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिदेंना विरोध बोलण्यास विरोध करण्यात आला असला तरी दुसरीकडे परळीतील ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी हजेरी लावली. तसेच त्यांनी  भाषणही केले.