साताऱ्यातील विसर्जन मिरवणूकीतून डीजे आणि राजे दोघेही गायब; नेमके काय घडले

0
471

सातारा, दि. २४ (पीसीबी) – ‘डीजे वाजवणारच… कोर्टाचा अवमान झाला तर मी बघून घेईन…’ असे म्हणणारे खासदार उदयनराजे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कुठे दिसलेच नाहीत. विसर्जनापूर्वी प्रसार माध्यमाच्या हेडलाईन्समध्ये राहणारे राजे मिरवणुकीतून गायब झाले होते. त्यामुळे नेमके काय झाले, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. साताऱ्यातून डीजे आणि राजे असे दोघेही गायब झाले. गणेशोत्सवाआधी राणा भीमदेव थाटामध्ये राजेंनी एल्गार केला… ‘काय वाट्टेत हे होऊ दे… डीजे वाजणारच…’ पण प्रत्यक्षात काल साताऱ्यामध्ये एकाही मंडळात डीजे वाजलाच नाही.