Maharashtra

साताऱ्याचा विकास तर मुख्यमंत्र्यांनीच केला; राष्ट्रावादीने तर आडवाआडवीचे कामे केले – खा. उदयनराजे भोसले

By PCB Author

August 24, 2019

सातारा, दि. २४ (पीसीबी) – साताऱ्याचा विकास तर मुख्यमंत्र्यांनीच केला आहे. राष्ट्रावादी काँग्रेसने तर आडवाआडवीचे कामे केले आहे. विकसकामासाठीच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळोवेळी भेटत असतोय. तसेच माझ्या भाजप प्रवेशच्या चर्चा जर रंगत असेल तर चांगलेच आहे, खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशाबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजेंचे बंधू आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सत्तेसोबत असल्यामुळे शिवेंद्रराजे हे सातऱ्यात आणखी मजबूत आणि सक्षम होतील, याची भीती आहे, त्यामुळे उदयनराजे भोसले हे पक्ष बदलण्याच्या विचारात आहेत, तसेच शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्यामुळे उदयनराजे अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे बोलले जात आहे.