Maharashtra

सातारा जिल्ह्यातील पसरणी घाटात शिवशाही व लक्झरी बसचा भीषण अपघात

By PCB Author

December 09, 2019

सातारा, दि.९ (पीसीबी) –सातारा जिल्ह्यातील पसरणी घाटात ट्रॅव्हल्स आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला असून ३३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. महाबळेश्वरहून वाईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने पसरणी घाटात वाईहुन महाबळेश्वरला जाणाऱ्या शिवशाही बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी वाईमधील  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवशाही बस वाईकडून महाबळेश्वरकडे पाचगणी घाटातून जात होती. यावेळी समोरून भरधाव वेगात येणारी  ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिली. यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅव्हल्स रस्त्यातच पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

एसटी महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शिवशाही बसच्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. शिवशाही बस सेवा सुरू झाल्यापासून अपघाताचा आकडा जवळपास ५५० पार केला आहे.