साडेदहा लाखांचे टेलिकॉम मटेरियल न पोहोचवता विश्वासघात; ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

0
275

चाकण, दि. १० (पीसीबी) – टेलिकॉम मटेरियल विविध ठिकाणी पोहोच करण्यासाठी एका ट्रान्सपोर्ट कंपनीला देण्यात आले. मात्र ट्रान्सपोर्ट कंपनीने 10 लाख 65 हजारांचे टेलिकॉम मटेरियल ठरलेल्या ठिकाणी न पोहोचवता विश्वासघात केला. हा प्रकार 3 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत बिरदवाडी येथील सुहास शांताराम सहाणे यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीत घडली.

मनोज सीताराम नासरे (रा. वेहेरगाव, ता. मावळ), दिनेश वसंत बोरकर (रा. तीनखेडा, ता. नारखेडा, जि. नागपूर), सुहास शांताराम सहाणे (रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवेंद्र श्रीकेशरीप्रसाद द्विवेदी (वय 43, रा. रासे, ता. खेड, मूळ रा. मध्यप्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी 10 लाख 65 हजार 580 रुपयांचे वोडाफोन आणि आयडिया कंपनीचे टेलिकॉम मटेरियल आरोपींना पिंपरी बु., रावेत मुकाई चौक, भोसरी, महाळुंगे येथे पोहोचविण्यासाठी दिले. मात्र आरोपींनी विश्वासघात करून ते मटेरियल दिलेल्या ठिकाणी न पोहोचवता फिर्यादी यांचा विश्वासघात केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.