साजिद खानने कपडे उतरविण्यास सांगितले; सिमरन कौरचा आरोप

0
782

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – सिनेदिग्दर्शक साजिद खानच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सिनेदिग्दर्शिका सलोनी चोप्रा आणि पत्रकार करिश्मा उपाध्याय यांच्या आरोपानंतर आता जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या सिमरन कौर सुरीने दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. ऑडीशनच्या नावाखाली साजिद खानने आपल्याला कपडे उतरवायला सांगितले होते, असा गंभीर आरोप सुरीने केला आहे.

‘हिम्मतवाला’ या सिनेमाच्या ऑडीशनसाठी साजिदने आपल्याला कार्यालयाचा पत्ता मला  दिला होता.  मात्र प्रत्यक्षात मी तिथे पोहोचले, तेव्हा ते त्याचे कार्यालय नव्हते. तर त्यांचे घर असल्याचे मला समजले. तिथे त्याने आपल्याशी गैरवर्तन केल्याचे  सुरीने  म्हटले आहे.

दरम्यान, पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनी साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. तर साजिदने अनेक महिने माझं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप ‘हमशक्ल’ सिनेमात साजिदची सहदिग्दर्शक असलेली सलोनी चोप्राने केला आहे. याशिवाय अभिनेत्री रॅचेल व्हाईटनेही साजिदवर आरोप केले होते.