‘साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटींचा निधी द्यावा

0
433

नाशिक, दि.२१ (पीसीबी) – श्री साईबाबा जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरी यांच्यात वाद पेटला असताना यामध्ये आता बीडकरांनीही उडी घेतली आहे. साईबाबा पाथरीहून शिर्डीसाठी जात असताना बीडमध्ये काही काळ वास्तव्यास होते. याठिकाणी साईबाबांनी नोकरी केली, त्यामुळे साईंची कर्मभूमी म्हणून बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटींचा निधी द्यावा अशी मागणी बीडमधील साईभक्तांनी केली आहे.

श्री साईबाबा जन्मस्थळावरुन सध्या शिर्डी आणि पाथरी यांच्यात वाद सुरु आहे. सर्वात आधी साईबाबा औरंगाबादच्या पैठण तालुक्यातल्या धुपखेडा गावात अवतरल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. या घटनेचा साईचरित्रातही उल्लेख आहे. त्यामुळे धुपखेड्याला विकास निधी का नाही ? असा सवाल गावकऱ्यांनी केला.