“सांगवी बोपोडी या मुळा नदीवरील पुलाचे व जोड रस्त्याचे डिझाईन बदलण्याची मागणी”

0
250

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महापौरांच्या प्रभागात निदान एक तरी प्रकल्प होऊ द्या या मी केलेल्या विनंतीला अनुसरून सांगवी येथे मुळा नदीवर शितोळे परिवाराने खाजगीरित्या वाटाघाटी करून पूल बांधण्याची परवानगी दिल्याने महानगरपालिकेने या जागेतून पुलाला जोड रस्ता व पुढे पुणे मनपा हद्दीत शासकीय जागा घेऊन पुणे विद्यापीठालगत असणाऱ्या औंध -स्पायसर रस्त्याला जोडणारा रस्ता प्रस्तावित केला आहे.

आज हा प्रकल्प चालू होणार यासाठी समाधान आहे. परंतु अत्यंत साध्या पद्धतीने डिझाईन केलेल्या रस्ता व पुलाला आमचा अक्षेप असून त्याकरिता काही सूचना सुद्धा आहेत त्याची अंमलबजावणी आपणाकडून व्हावी व या करिता योग्य वाटल्यास सदर निविदा फेररचना होऊन पुन्हा करावी म्हणून विनंती आहे, यासाठी खालील प्रमाणे विचार व्हावा

· सांगवी-बोपोडी हा मुळा नदीवरील प्रस्तावित पुल पुणे व पिंपरी चिंचवड या दोन शहरांच्या हद्दीवर आहे. त्यामुळे या भव्यता आज रोजी सल्लागारांनी केलेल्या डिझाईन मध्ये दिसून येत नाही.

·पुणे विद्यापीठालगत सदर पूल जोडला जाणार असल्याने विद्येचे माहेरघर व औद्योगिक नगरी या कॉमन थीमवर फुलाचे डिझाईन असावे.

·पिंपरी चिंचवड मध्ये अंदाजे दोनशे मीटर व पुणे हद्दीत अंदाजे 900 मीटर असा जोड रस्ता असून या जोड रस्त्यावर कोणताही आकर्षकपणा असेल अशी तरतूद निविदेनुसार दिसून येत नाही.

· पुणे हद्दीत पन्नास वर्षे ते दीडशे वर्षे वयाची झाडे या रस्त्यालगत असून त्याची भव्यता व आकर्षकपणा जपण्यासाठी सल्लागाराने कोणताही प्रयत्न केलेला दिसून येत नाही.

·स्मार्ट सिटी प्रमाणे रस्त्याचा प्रकार आकर्षक वेटिंग एरिया, गझेबो सिटिंग, ओपन जीम नदीलगत संरक्षण भिंत, आकर्षक म्युरल अशाप्रकारे काम असावे.

·स्मार्ट सिटी प्रमाणे खोदाई करून पी क्यू सी डिझाईन प्रमाणे रस्ता व अर्बन डिझाईन असावे व त्या डिझाईन मध्ये रोड जंक्शन, चौक सुशोभीकरण, संरक्षण भिंत असावी.

·प्रत्यक्ष पुलाचे डिझाइन अत्यंत साध्या पद्धतीचे असून पिंपरी चिंचवड पुणे या दोन शहराचा मध्य म्हणून पुलाचा आकर्षकपणा व ड्रॉइंग, डिझाईन याच्यात दिसून येत नाही. यासाठी दोन्ही बाजूला मुबलक जागा असल्याने तसेच ब्ल्यु लाईनचा विचार करता Suspension Bridge with cable stayed याचा विचार होऊ शकतो का?

· पिंपरी चिंचवड शहर हे रस्ता, पूल, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल यासाठी प्रसिद्ध आहे व त्याचा विसर पडलेला आहे हे या कामात दिसून येते.

या परिसरातील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना कदाचित कायमस्वरूपी होणाऱ्या अशा सुविधेला आकर्षकपणा, मजबूतपणा असावा असे वाटत नसावे. परंतु, प्रशासन म्हणून व शहराला आकर्षकपणा देणारे इंजिनियर म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला भव्यता, आकर्षकपणा व मजबूतपणा या दृष्टीने नव्याने बनवावे हीच अपेक्षा. सल्लागाराने या परिसरातील हिरवाई व मुळा नदीचा आकर्षकपणा याचा कोणताही आकर्षकपणा प्रस्तावित डिझाईन मध्ये रेखाटला नाही हे सर्व काम केवळ आणि केवळ एकदाच होणार आहे हे लक्षात घ्यावे व त्याप्रमाणे बदल व्हावेत.सदर पूल एकदाच होणार आहे त्यामुळे केवळ पूल केला अशी पाठ थपवून घेताना केवळ आम्हीच असा आकर्षक पूल केला असे सत्ताधार्‍यांनासुद्धा सांगता आले पाहिजे.
ज्याप्रमाणे प्राधिकरणाने रावेत बंधारा येथील संत तुकाराम महाराज पूल ज्याला अनेकजण बास्केट ब्रिज म्हणतात व नागरिकही आकर्षकपणाने पूल पाहण्यासाठी जातात तशा पद्धतीचे काहीसे वेगळे डिझाईन असण्याची अपेक्षा आहे.

विनाकारण करायचा म्हणून रस्त्यावर पूल करू नका. आजच्या शहराच्या विकासाला शोभेल असा करावा किमान सध्या शहराचे प्रथम नागरिक असणारे महापौर या प्रभागाचे आहेत याचा विचार करून तरी त्यांच्या पदाला शोभेल व परिसराचे आकर्षण होईल असा हा पूल प्रकल्प करावा ही तीव्र मागणी या पत्राद्वारे करीत आहे.