Chinchwad

सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील महिलेच्या व्हॉट्सअॅप नंबर अज्ञाताने पाठवले अश्लील मेसेज

By PCB Author

November 19, 2018

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – महिलेचा व्हॉट्सअॅप नंबर प्राप्त करुन अज्ञात इसमाने त्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर अश्लील व्हिडीओ आणि मेसेज पाठवून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१८) सायंकाळी सहाच्या सुमारास सांगवी पोलीस ठाणे हद्दीत घडली.

याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, ९५११६८३९४२ या व्हॉट्सअॅप नंबर धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका ४६ वर्षीय महिलेला त्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर ९५११६८३९४२ या क्रमांकावरुन अज्ञात इसमाने रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी सहाच्या सुमारास अश्लील व्हिडीओ आणि मेसेज पाठवून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी या मोबाईल नंबर धारकाविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक एस.ए.निकुंभ तपास करत आहेत.