सांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या; आमदार जगताप यांची आरोग्यमंत्री दिपक सांवत यांच्याकडे मागणी

0
401

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील क्षयरोग रुग्णालयाच्या मालकीची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या गोडाऊनची जागा सांगवी पोलिस ठाण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. तसेच रुग्णालयाच्या आवारात दुरवस्थेत असलेल्या पाण्याच्या टाकीची २० गुंठे जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतर करावी. या जागेत महापालिकेकडून पाण्याची नवीन टाकी बांधून रुग्णालयालाही पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारात असलेल्या निवासस्थानात अनधिकृतपणे राहत असणाऱ्यांना बाहेर काढून त्याचा योग्य वापर करण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्याकडे शनिवारी (दि. ८) केली. या सर्व मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री सावंत यांनी दिले.