सांगवीत सीएम चषक क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंना दिलीप वेंगसरकरांनी केले मार्गदर्शन

0
647

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने सांगवीत आयोजित सीएम चषक क्रिकेट स्पर्धेला माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी बुधवारी (दि. २६) उपस्थिती लावली. तसेच स्पर्धेतील खेळाडूंना मार्गदर्शन केले.

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार आणि शंकरशेठ जगताप मित्र परिवाराच्या सहकार्याने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे १५ डिसेंबर रोजी आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गेल्या गेल्या बारा दिवसांपासून क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेला अनेक संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी बुधवारी (दि. २६) स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली. संयोजकांसोबत चर्चा करून त्यांनी स्पर्धेची माहिती घेतली. यावेळी उद्योजक व माजी नगरसेवक शंकर जगताप, अजय दूधभाते, मनीष कुलकर्णी, रामदास कस्पटे, हिरेन सोनवणे, किरण दहिवाळ, संजय भालेराव, महेश जाधव, प्रकाश बाबर, सुशांत जाधव, गणेश बनकर, पुष्कराज, बिरू व्हनमाने, संदिप बनकर, मकरंद देशमुख आदी उपस्थित होते.

दिलीप वेंगसरकर यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन केले. खुद्द वेंगसरकर यांनी खेळाची माहिती दिल्याने खेळाडू भारावून गेले होते. यावेळी स्पर्धा संयोजकांच्या वतीने दिलीप वेंगसरकर व माजी नगरसेवक शंकर जगताप यांचा सत्कार करण्यात आला.