Chinchwad

सांगवीत महिलेचा अश्लिल फोटो व्हॉट्सअॅपवर शेर करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा

By PCB Author

March 11, 2019

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – अज्ञाताने महिलेचा चेहरा वापरून अश्लील फोटो तयार केला. त्यानंतर तो फोटो त्याच महिलेला व्हॉट्सअॅपवर पाठवला. ही घटना रविवारी (दि.१०) सांगवी येथे घडली.

याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ८८६२०६८८३० या अज्ञात मोबाईल क्रमांक धारकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ८८६२०६८८३० या अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाने ३४ वर्षीय महिलेचा चेहरा वापरुन अश्लील फोटो तयार केला. त्यानंतर तो फोटो महिलेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकारवर पाठवून ‘कसे आहेत फोटो’असा मजकूर टाकला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.