Chinchwad

सांगवीत प्रियकराने लग्नास नकार दिल्याने ‘लिव्ह इन रिलेशन’ शिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या

By PCB Author

November 15, 2018

सांगवी, दि. १५ (पीसीबी) – प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने ‘लिव्ह इन रिलेशन’ शिपमध्ये राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१४) रात्री साडेअकराच्या सुमारास सांगवी परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत २३ वर्षीय तरुणी गेल्या तीन वर्षांपासून आयटी कंपनीतील एका तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होती. त्या तरुणाचे नुकतेच लग्न ठरल्याने तरुणी तनावात होती. तिने तरुणाकडे लग्न करण्यास तगादा लावला होता. मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तरुणीने राहत्या घराच्या इमारतीवरील टेरेसवरून उडी घेतली. या घटनेमध्ये तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.