Chinchwad

सांगवीत पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

By PCB Author

April 04, 2019

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – पतीच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.३) सकाळी नऊच्या सुमारास घडली.

याप्रकरणी मृत महिलेच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती रईस रफिक शेख (रा. शितोळेनगर, सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रईस त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे तसेच तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत असे. त्या आजारी पडल्यानंतरही त्यांच्यावर उपचार केले नाहीत. तसेच वारंवार शिवीगाळ मारहाण करून त्यांना दबावाखाली ठेवले. या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात रईस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याला रात्री उशीरा अटक करण्यात आली. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.