सांगली, इस्लामपूरसह पुण्याकडून येणारी लोकं तेथेच थांबवली पाहिजेत – जिल्हाधिकारी

0
665

 

कराड, दि.२९ (पीसीबी) – इस्लामपूरमध्ये सापडलेल्या संशयितांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कऱ्हाडमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजना समाधानकारक असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्याबाहेरुन जिल्ह्यात येणारी आणि विशेषतः सांगली, इस्लामपूरसह पुण्याकडून येणारी लोकं तेथेच थांबवली पाहिजेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी शहरासह तालुक्यात करण्यात आलेल्या उपययोजनासंदर्भात समाधान व्यक्त करत इस्लामपूरमध्ये सापडलेल्या संशयितांच्या पार्श्वभूमीवर आणि पुण्यामधील सद्यस्थितीवरुन कऱ्हाडमध्ये व जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरुन येणारी विशेषतः सांगली, इस्लामपुरसह पुण्याकडून येणारी लोकं तेथेच थांबवली पाहिजेत, असे आवाहन अधिकाऱ्यांना करुन त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती करण्याचे आदेश दिले. याचशिवाय राज्यसरकारकडून देण्यात आलेल्या आदेशांची योग्य अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

या आढावा बैठकीला प्रांताधिकारी, पोलिस उपाधिक्षक, पालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी उपस्थित होते.