Maharashtra

सांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड

By PCB Author

August 20, 2018

सांगली, दि. २० (पीसीबी) –  सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर  झाला आहे. भाजपच्या संगीता खोत यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड  झाली. सांगली महापालिकेचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार वर्षा अमर निंबाळकर यांना ३५ मते पडली. तर भाजपकडून संगीता खोत यांना ४२ मते मिळाली. तसेच उपमहापौरपदासाठी भाजपच्या धीरज सूर्यवंशी  यांना ४२ मते पडली. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या  स्वाती पारधी यांना ३५ मते पडली.

यावेळी स्वाभिमानी विकास आघाडीचे एकमेव नगरसेवक आणि माजी उपमहापौर विजय घाडगे हे  मतदानवेळी तटस्थ राहिले. दरम्यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर जल्लोष न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.