Pune Gramin

सह्याद्री प्रतिष्ठानने बसविले किल्ले नारायणगडावर वास्तूदर्शक फलक

By PCB Author

July 09, 2018

जुन्नर, दि. ९ (पीसीबी) – सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने अनेक ऐतिहासिक घडामोडींची साक्ष देणाऱ्या व आपल्या देशात लोकशाही येईपर्यंत दिर्घकाळ ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगड या किल्ल्यावर रविवार (दि. ८) दुर्ग संवर्धन मोहिम राबवण्यात आली. ह्या मोहिमेत किल्ल्याचे अस्तित्व व किल्ल्यावरील वास्तू दाखवणारे दिशा दर्शक, वास्तूदर्शक फलक लावण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था गेल्या १० वर्षांपासून दुर्गसंवर्धनचे काम करत असून महाराष्ट्रातील निरनिराळ्या किल्लनवर ७०० हुन अधिक मोहीमा सह्याद्री प्रतिष्ठानने राबविल्या असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रविण शिर्के यांनी दिली. या मोहिमेत प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, निलेश जेजुरकर, रतिलाल बाबेल, अनिल दिवेकर, संजय पवार, अमित भोर, रमेश भोसले, राजेश भोर, सिद्धेश कानडे, अमित कुलकर्णी, तेजस रोकडे, आदिनाथ बोऱ्हाडे, तुषार टेमकर, मयुर शिंदे, गौरव शेवाळे, अजित राक्षे, सचिन आंद्रे, पराग छल्लरे, स्वप्नाली वाळके, गणेश पुजारी, महेश तांबे आदींनी सहभाग नोंदवला होता.