सह्याद्रि वाहिनीवर डॉ. यशवंत इंगळे यांची आज विशेष मुलाखत

0
289

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – कोरोना नंतर होणाऱ्या म्युकरमाइकोसिस या आजाराची कारणे, उपाय आणि घ्यावयाची खबरदारी या विषयावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे मुख शल्य चिकित्सक आणि विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांची विशेष मुलाखत शनिवारी (आज) दुपारी १२ वाजता होणार आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्रि वाहिनीवर `आरोग्य संपदा` या कार्यक्रमात ही मुलाखत आरती पटवर्धन घेणार असून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.