सहाव्या मजल्यावरून उडी मारुन युवकाची आत्महत्या

0
403
white shape of body and blood stains on asphalt texture

पिंपरी, दि. 1 (पीसीबी): राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारुन एकाने आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवा री) सकाळी दहाच्या सुमारास वाकड येथे घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

मयूर दाभाडे (वय 34, रा. युरो स्कूलजवळ, वाकड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर याने सकाळी दहाच्या सुमारास राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. त्यात तो गंभीर जखमी झाला.
हा प्रकार पाहिल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी त्याला चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तपासणीपूर्वीच मयूरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.