सहमती नव्हतीच, अकबर यांनी बलात्कारच केला-पल्लवी गोगोई

0
415

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – पल्लवी गोगोई यांनी एम. जे अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. एशियन एज या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केल्याचा दावा पल्लवी गोगोई यांनी केला. आरोपांवर स्पष्टीकरण देताना एम जे अकबर यांनी मात्र आपल्यातील शरीरसंबंध परस्पर संमतीने होते अशी कबुली दिली. मात्र हे आरोपही खोडून काढत पुन्हा एकदा पल्लवी गोगोईने ट्विट करत सहमती नव्हती तो बलात्कारच होता असे म्हटले आहे. बळाचा आणि पदाचा गैरवापर करत एम. जे अकबर यांनी माझ्यावर बलात्कारच केला असे पल्लवी गोगोई यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.