Desh

सलमान खान काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढवणार ?

By PCB Author

January 23, 2019

भोपाळ, दि. २३ (पीसीबी) – अभिनेत्री करिना कपूर हिने निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर  आता बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान काँग्रेसच्या तिकीटावर आगामी लोकसभा  निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.  मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे सचिव राकेश यादव यांनी माहिती दिली आहे.

सलमान खान हा मध्य प्रदेशातील इंदूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.  सलमान जन्म देखील इंदोरमध्ये झाला आहे.  त्यामुळे  त्याचे इंदूरचे नाते खूप जुने आहे. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी सलमान खानला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

दरम्यान, सलमान खान  याची पंतप्रधान  मोदीशी चांगली जवळीक आहे. त्यामुळे  तो काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक  का लढवणार? असाही प्रश्न  उपस्थित केला जात आहे. तर याबाबत सलमान खानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.