Notifications

सलग १७ वा दिवस; पेट्रोलच्या दरात १४, तर डिझेलच्या दरात २३ पैशांनी वाढ

By PCB Author

September 11, 2018

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमध्ये सलग १७ व्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल १४ तर डिझेल १५ पैशांनी महागले आहे. यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८८.२६ रुपये प्रतिलिटर झला असून डिझेलचा दर ७७.४७ रुपये प्रतिलिटर झाला आहे. सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी २३ पैशांची वाढ झाली होती. राज्यातील परभणीमध्ये पेट्रोलसाठी सर्वात जास्त पैसे मोजावे लागत असून पेट्रोलने नव्वदी ओलांडली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने काँग्रेसकडून सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. अनेक पक्षांनी काँग्रेसच्या भारत बंदला समर्थन देत आंदोलनात भाग घेतला होता. यावेळी अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना झाल्याचेही समोर आले.