Maharashtra

“सर्व सामान्यांवर जोर दाखवण्यापेक्षा, हॉस्पिटलमध्ये नर्सेस समोर अश्लील चाळे करणार्यांवर तुमचा जोर दाखवा”

By PCB Author

April 08, 2020

मुंबई,दि.८(पीसीबी) – ठाण्यातील एका तरुणाने गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. आव्हाड यांच्यासमोर त्यांच्याच बंगल्यावर नेऊन आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित तरुणानं केला आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

“अरे बाप रे अमानवीय ,सर्व सामान्यांवर जोर दाखवण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये उपचार देणार्या नर्सेस समोर विकृत अश्लील चाळे करणार्या हरामखोरांवर तुमचा जोर दाखवा, असं चित्रा वाघ यांंनी म्हटलं आहे.

https://mobile.twitter.com/ChitraKWagh/status/1247490540913868800

दरम्यान, संबंधीतांवर कारवाई व्हावी, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाणे पोलिस यांना ट‌ॅग केलं आहे.