सर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी

0
439

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या तोंडावर फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळी सणात फटाक्यांच्या विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना नेहमीप्रमाणे फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळी सण साजरा करता येणार आहे.