सर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी

0
779

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या तोंडावर फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळी सणात फटाक्यांच्या विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना नेहमीप्रमाणे फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळी सण साजरा करता येणार आहे.

तर फटाक्यांची ऑनलाईन  विक्री करण्यास बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे  ई –कॉमर्स साईटसवरून फटाके विक्री करता येणार नाही. ऑनलाईन फटाक्यांच्या विक्रीला परवानगी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

फटाके विक्रीबाबत अंशत: घातलेली बंदी ही देशभरात लागू असून पर्यावरण रक्षणासाठी या आदेशांचे नागरिकांनी पालन करावे, असे न्यायमूर्ती ए.के.सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी निर्णय देताना म्हटले आहे.