Desh

सर्वात मोठ्या ‘या’ क्रिकेट स्टेडियमला दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच नाव

By PCB Author

February 24, 2021

अहमदाबाद, दि.२४ (पीसीबी) : गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अशी ओळख आहे. आता या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. ‘नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद’ असं स्टेडियमचं नामकरणं करण्यात आलं आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे.

Gujarat: President Ram Nath Kovind inaugurates Narendra Modi Stadium, the world's largest cricket stadium, at Motera in Ahmedabad

Union Home Minister Amit Shah, Gujarat Governor Acharya Devvrat, Sports Minister Kiren Rijiju, and BCCI Secretary Jay Shah also present pic.twitter.com/PtHWjrIeeH

— ANI (@ANI) February 24, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या पिंक बॉल क्रिकेट सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.