Maharashtra

सर्वांनाच आरक्षण पाहिजे; मग मुस्लीम आरक्षणाचे काय ? – इम्जियाज जलील

By PCB Author

July 29, 2018

मुंबई, दि. २९ (पीसीबी) –  मराठा आमदार जास्त आहेत म्हणून तुम्ही आरक्षण मागता. धनगर आमदार आहेत ते आरक्षण मागतात. मग मुस्लीम आरक्षणाचे काय ? असा सवाल एमआयएमचे आमदार इम्जियाज जलील यांनी केला आहे.

मुस्लीम आरक्षण न्यायालयात टिकले होते, मग मुस्लीम आमदार नाही म्हणून हा मुद्दा कोणी उपस्थित करणार नाही का? सगळेच जण आपल्या समाजासाठी आरक्षणाची मागणी करणार, मग सर्वसाधारण प्रवर्गाबाबत काय? त्यांचा कोण विचार करणार? असा सवालही जलील यांनी उपस्थित केला आहे.

ज्या समाजाचे प्रतिनिधित्व जास्त त्याच समाजाचा आवाज येथे उठवला जातो, हे दुर्दैवी आहे,  असेही जलील म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत तोडग्यासाठी विधानभवनात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला इम्तियाज जलील यांचीही उपस्थिती होती. बैठकीत मराठा आमदार जास्त असल्यामुळे आरक्षण मागत आहेत, पण मुस्लीम आरक्षणाचे काय ? असा सवाल त्यांनी केला.