सर्वच हिंदुत्ववादी लोकांना दहशतवादी ठरवू नका – उद्धव ठाकरे

0
1023

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या अटकेप्रकरणी सुरू असलेल्या चर्चेत आता शिवसेनेने उडी घेतली आहे. सर्वच हिंदुत्ववादी लोकांना दहशतवादी ठरवले जाऊ नये, पानसरे, दाभोलकरांची हत्या करणारे कोणीही असोत, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. पण नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका, असे म्हणत सनातन संस्थेचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. उद्या देशावर संकट येईल तेव्हा हिंदूंची सर्व मने आणि मनगटे अशा कारवायांमुळे आधीच विझून गेलेली असतील, अशी भीती व्यक्त करत नक्षलवादी समर्थकांना ‘कथित’ नक्षलवादी समर्थक म्हटले जात आहे. पण अटकेत असलेल्या हिंदुत्ववादींचा उल्लेख थेट ‘हिंदू कट्टरपंथीय’ असा केला जातो असेही सेनेने म्हटले आहे.