Desh

सर्जिकल स्ट्राइक करताना बिबट्याच्या मलमूत्र आणि विष्ठेचा वापर – लेफ्टनंट जनरल निंभोरकर

By PCB Author

September 12, 2018

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – भारतीय लष्कराने २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राइक करताना बिबट्याच्या मलमूत्र आणि विष्ठेचा वापर केला होता. लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. यावेळी कुत्र्यांनी अडथळा आणू नये, यासाठी  बिबट्याच्या मलमूत्र आणि विष्ठेचा वापर केला गेला, अशी माहिती लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिली. 

याबाबत माहिती देताना राजेंद्र निंभोरकर म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइक करण्याआधी परिसराचा अभ्यास करत असताना त्या परिसरात अनेकदा बिबट्या कुत्र्यांवर हल्ला करत असल्याची माहिती मिळाली होती. बिबट्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी कुत्रे रात्रीच्या वेळी स्थानिक परिसरात आसरा घ्यायचे’, असे त्यांनी सांगितले.

‘सर्जिकल स्ट्राइकची रणनीती आखताना आम्हाला रस्त्यात असणाऱ्या गावांमधून जाताना कुत्रे भुंकण्याची आणि हल्ला करण्याची शक्यता वाटत होती. यासाठी आम्ही बिबट्याचे मलमूत्र आणि विष्ठा सोबत घेतली होती. आम्ही गावाच्या बाहेर त्यांचा वापर केला. आमची ही रणनीती चांगलीच यशस्वी झाल्याचे निंभोरकर यांनी सांगितले.