सरासरी काढून  देणार भूगोलाचे गुण

0
260

पिंपरी, दि.27 (पीसीबी) : कोरोनामुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा  पेपर झाला होता रद्द झाला होता. हा पेपर कधी घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असतानाच आता दहावीच्या विद्यार्थ्यांना अन्य विषयाच्या लेखी परीक्षेस प्राप्त गुणांच्या सरासरीनुसार भूगोल विषयाचे गुण देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. 

23  मार्च रोजी इयत्ता दहावीचा सामाजिक शास्त्रे पेपर -2 ( भूगोल) आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचा कार्यशिक्षण विषयाचा पेपर आयोजित केलेला होता.  मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले होते. हे पेपर कधी घेतले जाणार याकडे संबंधित विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते.

दहावीच्या विध्यार्थ्यांच्या इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून  दिले जातील.भूगोल विषयाचे  गुण संबंधित विद्यार्थ्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता दहावीचा भूगोलाचा पेपर घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोअबर दिव्यांग विद्यार्थ्यांना कार्यशिक्षण विषयाचे गुणही सरासरीनुसार मिळणार आहेत. महराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.