Pimpri

सराईत गुन्हेगाराकडून विवाहितेचा विनयभंग

By PCB Author

April 27, 2021

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – सराईत गुन्हेगाराने एका विवाहितेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 24) मध्यरात्री मोरेवस्ती, चिखली येथे घडली.

सोनू बाळासाहेब शिंदे (रा. मोरेवस्ती, चिखली) असे विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडित विवाहितेने सोमवारी (दि. 26) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पतीचे मोबाइलवरून भांडण झाले. त्यामुळे घरमालकाने पतीला मोहननगर येथे काही दिवस राहण्यास पाठविले. दरम्यान शनिवारी (दि. 24) मध्यरात्री आरोपी सोनू हा फिर्यादी विवाहितेच्या घरी आला. ‘मी येथे आजच्या दिवस झोपू का’, अशी विचारणा विवाहितेला केली. मात्र तिने नकार देताच आरोपीने तिला बेडवर ढकलून तिचा विनयभंग केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

आरोपी सोनू याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात खूनी हल्ला आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.