सराईत आरोपी गावठी पिस्तूलसह ताब्यात

0
286

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई

पुणे ग्रामीण दि.२७ (पीसीबी) – पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाच्या वतीने सराईत आरोपीला गावठी पिस्तुलासह ताब्यात घेण्यात आले व आरोपीस पुढील कारवाईसाठी हवेली पोलीस स्टेशनला सुपुर्द करण्यात आले आहे.

सविस्तर बातमी अशी की, मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये अवैध्य अग्निशस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करणे कामी दि.२६/०६/२०२१ रोजी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह गस्त करीत असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने शिवम आनंत बरिदे (वय २१ वर्ष रा-खडकवासला तालुका हवेली जिल्हा पुणे) यास खडकवासला परिसरामधून ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. सदर आरोपी हा सराईत असून त्याचेवर यापूर्वी पुणे शहर व पुणे ग्रामीण येथे अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार अंमली पदार्थ विक्री करणे तसेच मारामारी गंभीर दुखापत करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. आरोपीस पुढील कारवाईसाठी हवेली पोलिस स्टेशन ला सुपूर्द करण्यात आले आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, पोलीस हवालदार अब्दुल शेख, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत व या पथकाने केली, तांत्रिक मदत सुनिल कोळी व चेतन पाटील सायबर पोलिस स्टेशन यांनी केली.