Desh

सरदार वल्लभभाई पटेलांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’ मध्ये सहभागी व्हा; मोदींचे तरूणांना आवाहन

By PCB Author

October 28, 2018

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बहुचर्चित आणि जगातील सर्वांत मोठ्या पुतळ्याचे ३१ ऑक्टोबरला अनावरण करण्यात येणार आहे. याच दिवशी पटेल यांची जयंती आहे. त्यानिमित्त देशातील सर्व तरुणांनी ‘रन फॉर युनिटी’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आज (रविवार) ‘मन की बात’ या कार्यक्रमात केले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज आकाशवाणीवरील ४९ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित  केले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट उंची सरदार पटेल यांच्या हा स्टॅच्यू ऑफ यूनिटीची असेल, असे ते म्हणाले. सरदार पटेल यांनी कठीण प्रसंगात देशाला सावरले, त्यांनी देशात एकात्मता निर्माण करण्याचे कठीण काम केले. टाइम मॅगझिननेही पटेल यांच्या योगदानाची दखल घेतली, असे मोदी यांनी सांगितले.

११ नोव्हेंबर रोजी पहिल्या महायुद्धाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याचे सांगत मोदींनी भारतीय सैनिकांच्या शौर्याचा उल्लेख केला. त्या महायुद्धातील आपल्या कर्तुत्वाने आमच्या सैनिकांनी युद्ध करण्याची वेळ आली. तर आम्ही कुठेही कमी पडू शकत नाहीत, हे जगाला दाखवून दिले. तसेच २०१८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल मोदींनी खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले. त्याचबरोबर  भारतीय हॉकी टीमला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मोदींनी शुभेच्छाही दिल्या.