Maharashtra

सरणावरची आग अजूनही विझली नाही, मुले पोरकी शहीदांची हो निजली नाही; जितेंद्र जोशीची सुन्न करणारी कविता

By PCB Author

February 15, 2019

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. मराठी अभिनेते जितेंद्र जोशीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध करताना आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक भावनिक आणि मन सुन्न करणारी कविता पोस्ट केली आहे.

सरणावरची आग अजूनही विझली नाही

मुले पोरकी शहीदांची हो निजली नाही

निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी

मने कोरडी रक्तानेही भिजली नाही

आग लागली अवतीभवती

मनात पण ठीणगीहि नाही

अब्रू स्वाभिमान चिरडला

कितीक किड्यांसम फुटले

ती गणतीही नाही

सहिष्णुतेचा बुरखा घेऊन जगतो आम्ही

मरण ओढतो अजूनही आमची जिरली नाही

धर्म जाहला शाप

पसरले पाप

उरी अंधार दाटला

गिळून घेईल साप

लागुनी धाप

कोवळा जीव फाटला

अणु रेणूंचा स्फोट होऊनी

जळतो आम्ही

देवा(?) आता मनात आशा उरली नाही

निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी

मने कोरडी रकतानेही भिजली नाही

-जितेंद्र जोशी#पुलवामा #PulawamaTerrorAttack