सरकार पैसे नसताना योजना काढून लोकांचा जीव घेते; राज ठाकरेंचा निशाणा   

0
839

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – राज्य सरकार पैसे नसताना अशा योजना काढते. आणि लोकांचे जीव धोक्यात घालतात, अशा शब्दात मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला जाताना बुधवारी  स्पीड बोटला अपघात झाला. या अपघातात एकजण ठार झाला आहे. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या अपघात सुदैवाने लोकांचे जीव वाचले आहे. त्यासाठी परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत. सरकारकडे पैसे नसताना अशा योजना काढतात आणि लोकांचे जीव धोक्यात घालतात. नुसत्या मोठमोठ्या घोषणा करुन लोकांची फसवणूक सुरु आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी यावेळी केली.

जनतेच्या तोंडाला  पाने पुसण्याचे काम सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी  राज्य गहाण ठेवू, असे म्हणणारे राज्य सरकार ही स्मारके कशी बांधणार? राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, याबाबतचा आर्थिक अहवाल समोर आलेला आहे.  त्यामुळे मुख्यमंत्र्यानी सरकारचा शिल्लक असलेला  काळ नीट ढकलावा, असा उपरोधिक टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.