Maharashtra

सरकार आहे की एक जिवंत लाश हेच कळत नाही – आ. नितेश राणे

By PCB Author

April 17, 2020

 

मुंबई, दि.१७ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करत असून नागरिकांना धान्य आणि इतर अत्यावश्यक सुविधा राज्य सरकार देत आहे असे सरकारी पक्षांकडून दावा केले जात आहे. तर विरोधी पक्षाकडून सरकारकडून केलेले प्रयत्न पुरेसे नाही अशी टीका होत आहे.

आता भाजपचे कोकणातले आमदार नितेश राणे यांनी सरकारवर ट्विट करून टीका केली आहे.

नितेश राणे काय म्हटले ट्विट मध्ये पाहुया,राज्यातील सरकारवर कोण खुश आहे असा सवाल केला आहे. तसेच या सरकारच्या कारभारावर डॉक्टर, पोलीस, मिडिया आणि जनता असे सगळेच नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्वीटरवर म्हटलंय

महाराष्ट्र सरकारवर नेमके कोण खुश आहे ??
1.)PPE कीटस नाहीत, म्हणून डॉक्टर नाराज…

2.)महाबळेश्वरच्या घटनेमुळे पोलीस खचले…

3.)राहुल कुलकर्णीच्या घटनेमुळे मीडिया नाराज…

4.)कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जनता चिंतेत..

सरकार आहे की एक जिवंत लाश
हेच कळत नाही !!

— nitesh rane (@NiteshNRane) April 16, 2020