Desh

सरकारी कर्मचाऱ्यांना झटका; पीएफवरील व्याज घटले

By PCB Author

July 17, 2019

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना जोरदार झटका दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या (GPF) व्याजदरात कपात केली आहे. १० बेसिस पॉइंटची कपात केल्यानंतर या फंडातील जमा रकमेवर ८ टक्क्यांऐवजी ७.९ टक्के व्याज मिळणार आहे. नवीन व्याजदर १ जुलैपासून लागू झाले आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जीपीएफवरील व्याजदरात कपात करण्यात येत असल्याची माहिती दिली. जीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात १० बेसिस पॉइंटची कपात केली आहे. १ जुलैपासून ७.९ टक्के व्याज मिळणार आहे, असे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले. गेल्या तीन तिमाहीपासून या फंडावर ८ टक्के व्याज मिळत होता.

‘या कर्मचाऱ्यांना कपातीचा फटका’

जनरल प्रॉव्हिडंट फंड (सेंट्रल सर्व्हिसेस)

कॉन्ट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड (इंडिया)

स्टेट रेल्वे प्रॉव्हिडंट फंड

इंडियन ऑर्डनन्स डिपार्टमेंट प्रॉव्हिडंट फंड

इंडियन ऑर्डनन्स फॅक्ट्रीज वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड

जनरल प्रॉव्हिडंट फंड (डिफेन्स सर्व्हिसेस)

डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड

आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रॉव्हिडंट फंड

इंडियन नेव्हल डॉकयार्ड वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड