Desh

सरकारने विमानाची व्यवस्था करून आपल्या बांधवाना घरी आणावे – राहुल गांधी

By PCB Author

April 15, 2020

 

दिल्ली, दि.१५ (पीसीबी) – कोरोनामुळे देशातील अनेक कारखाने आणि उद्योगधंदे हे ठप्प झाले आहेत. त्यामुळे कामगार हे सध्या अनिश्चित काळासाठी रजेवर असल्याने बाहेरगावी राहणाऱ्या कामगारांनी आपल्या घरी राहण्याचा आग्रह केला आहे. मात्र देशात लॉकडाऊन असल्याने वाहन, रेल्वे बंद असल्याने अनेक कामगार हे अडकून बसले आहेत.

यावरचं कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटर वरून अशा कामगारांसाठी रेल्वे, वाहन सुरु करून त्यांची जायची सोय करावी, अशी मागणी केली आहे. राहुल गांधींनी ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की, देशातील मध्य पूर्वेतील अनेक कारखाने बंद आहेत. त्यामुळे सरकारने विमानाची व्यवस्था करून आपल्या बांधवाना घरी आणावे अशी विनंती केली आहे. तर या नागरिकांना काही दिवस क्वारांनटाईन करावे, अशीही विनंती केली आहे.

The #Covid19 crisis & shutting of businesses in the Middle East have left thousands of Indian workers in deep distress & desperate to return home. The Govt must organise flights to bring home our brothers & sisters most in need of assistance, with quarantine plans in place.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 15, 2020