Chinchwad

”सरकारने तीन महिन्याचे रेशन आगाऊ द्यावे”

By PCB Author

February 22, 2021

आकुर्डी, दि. २२ (पीसीबी) – कोरोनाच्या नव्या संसर्गामुळे सरकारने जनहितासाठी निर्बंध लागू केलेले आहेत.  2020 मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील बहुसंख्य अल्प वेतनधारी श्रमिक जनतेची आर्थिक आबाळ झाली होती. लाखो कुटुंबियांना चूल पेटवणे अवघड झाले होते. आता पुन्हा लॉकडाऊनची भाषा सुरू असल्याने कष्टकऱ्यांचे जगने कठीण झाले आहे. जर का लॉकडाऊ होणार असेल तर मार्च महिन्यात गरजू लोकांना खाद्यतेल, साखर,चहा डाळीसहित पुढील तीन महिन्याचे रेशन पुरवावे, ज्यांची रेशनकार्ड नियमित झालेली नाहीत,अथवा अन्य जिल्ह्यातील आहेत,त्यांना कोव्हीड शिक्का मारुन अन्नधान्य वितरण व्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी माकप च्या पुणे जिल्हा बैठकीत कऱण्यात आली आहे.

माकप पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड नाथा शिंगाडे यांनी पक्षाच्या बैठकीत हा विषय मांडला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड समितीच्या वार्षिक आढावा बैठकीत ते बोलत होते. वीरभद्र स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस गणेश दराडे,बाळासाहेब घस्ते,सतीश नायर,अपर्णा दराडे,किसन शेवते,निर्मला येवले,रिया सागवेकर,सचिन देसाई,अमिन शेख,ख्वाजा जमखाने,स्वप्निल जेवळे इ प्रमुख यावेळी उपस्थित होते