सरकारच्या अपयशामुळे डान्सबारला परवानगी; आबांची कन्या स्मिता पाटलांची खंत

0
645

सांगली, दि. १७ (पीसीबी) – डान्सबार बंदीसाठी  दिवंगत माजी गृहमंत्री आर .आर. पाटील यांनी आपले आयुष्य पणाला लावले होते. मात्र, सध्याचे सरकार  अपयशी ठरल्याने डान्सबारला  परवानगी मिळाली.   आजचा दिवस हा काळा दिवस म्हणावा लागेल, अशी खंत दिवंगत  आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी व्यक्त केली आहे.