Maharashtra

सरकारच्या अपयशामुळे डान्सबारला परवानगी; आबांची कन्या स्मिता पाटलांची खंत

By PCB Author

January 17, 2019

सांगली, दि. १७ (पीसीबी) – डान्सबार बंदीसाठी  दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी आपले आयुष्य पणाला लावले होते. मात्र, सध्याचे सरकार  अपयशी ठरल्याने डान्सबा ऱला  परवानगी मिळाली.  आजचा दिवस हा काळा दिवस म्हणावा लागेल, अशी खंत दिवंगत  आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आज (गुरूवार) तासगावमध्ये स्मिता  बोलत होत्या.  राज्य सरकारने डान्स बारबाबत घातलेल्या  अनेक अटी रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने आज   पुन्हा डान्सबार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यावर स्मिता पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत त्या म्हणाल्या की,  एका तरुणाने आपल्या आईचा खून करुन तिचे दागिने विकून डान्सबारमध्ये पैसे उडवले.  या घृणास्पद घटनेनंतर आर. आर. आबांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकार कुठे तरी कमी पडले  असून आवश्यक पूर्तता या सरकारने न्यायालयात केल्या नाहीत.  पण मी आबांची कन्या म्हणून  यावर आवाज उठवणार आहे,  असे त्यांनी सांगितले.